Ad will apear here
Next
रोपळे गावातील पाटील विद्यालयात आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा


सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात गुरुकुल प्रकल्पांतर्गत आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. आकाशकंदील कसा बनवावा आणि तो कसा सजवावा याची प्रात्यक्षिके विद्यार्थी-विद्यार्थिनींना दाखवून ते करण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकाशकंदिलांचे विद्यालयात प्रदर्शनही भरवण्यात आले होते. 



पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बिभीषण पाटील व पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याअंतर्गत यंदा आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. ग्रामीण भागातील मुलांनी आपल्या घरचा आकाशकंदील आपणच बनवला पाहिजे आणि आकाशकंदील आकर्षक बनवून त्याची विक्रीही करता आली पाहिजे, असा दुहेरी उद्देश ठेवून ही कार्यशाळा घेण्यात आली. 



दोन-तीन दिवस उत्तम पद्धतीने सराव करून घेतल्यामुळे शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आता आकर्षक आकाशकंदील बनवायला शिकले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मुलांना या कलेच्या माध्यमातून चार पैसेही मिळतील, अशी आशा शिक्षकांना आहे. कलाशिक्षक कल्लेश्वर पानसांडे यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध प्रकारचे आकाशकंदील बनवायला शिकवले. त्याची प्रात्यक्षिकेही दाखवली. 



मुख्याध्यापक बिभीषण पाटील म्हणाले, ‘आमच्या शाळेत गुरुकुल प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेतली. कलाशिक्षक कल्लेश्वर पानसांडे यांनी विद्यार्थ्यांकडून आकाशकंदील बनवण्याचा चांगला सराव करून घेतल्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी आता आकर्षक आकाशकंदील बनवू लागले आहेत.’















 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZUACF
Similar Posts
रोपळे गावातील पाटील विद्यालयात ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण सोलापूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात ई-लर्निंगच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे गावाच्या शैक्षणिक विकासात भर पडत आहे.
‘ना जातीवर, ना धर्मावर, मतदान करा कार्यावर!’ सोलापूर : ‘ना जातीवर ना धर्मावर... मतदान करा कार्यावर... !’ असा संदेश रोपळे (ता. पंढरपूर) येथील शाळकरी मुलांनी दिला. रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनीनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृतीसाठी गावातून रॅली काढली होती. जाती-पातीवर मतदान न करता उमेदवाराचे कार्य पाहून मतदान करण्याचे आवाहन मुलांनी केले
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रोपळे गावात मिरवणूक सोलापूर : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती २२ सप्टेंबर रोजी रोपळे (ता.पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेची गावातून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
वसुबारस, धनत्रयोदशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट सोलापूर : वसुबारस आणि धनत्रयोदशीनिमित्ताने शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिरांचा गाभारा आकर्षक, रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आला होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language